Sensex plunges to 57,000
देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ५७ हजारांवर
मुंबई : देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली. जागतिक बाजारातल्या परिस्थितीचा परिणाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीचा परिणाम इतर समभागांवरही दिसून आला.
त्यामुळं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १ हजार १७२ अंकांनी घसरला आणि ५७ हजार १६७ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ३०२ अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक १७ हजार १७४ अंकांवर स्थिरावला.
Hadapsar News Bureau