Seva fortnight on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा
ना.चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात विशेष उपक्रमाचे आयोजन
पुणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीजी यांच्या वाढदिवस व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा केला जात असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मा. ना. पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आणि २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री यांनी ही विशेष उपक्रम आयोजित केला आहे.
या अंतर्गत कोथरूड मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक विविध दाखल्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. यात प्रामुख्याने रहिवास व अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रीमीलेयर दाखला, डोमीसाइल दाखला, ईडब्ल्यूएस (EWS) दाखला आणि आधार कार्ड दुरुस्ती व अद्यावत करणे आदींचा समावेश आहे.
नामदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी १०.३० ते ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित केले आहे. तरी नागरिकांनी आवश्य याचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com