Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात
- शाकंभरी पौर्णिमा
- शाकंभरी नवरात्र
- शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व आणि विधी
तुळजापुर : तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून तो ७ जानेवारी पर्यंत या साजरा होणार आहे. पंचामृत अभिषेक संपल्यानंतर काल संध्याकाळी तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला.
देवीची मंचकी निद्रा संपल्यानंतर ३० डिसेंबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना होईल, त्यानंतर विशेष पंचामृत अभिषेक पूजा होऊन सकाळी ६ वाजता नित्योपचार अभिषेक पूजा होईल.
दुपारी १२ वाजता शाकंभरी नवरात्रच्या मुख्य यजमान दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. त्यानंतर रात्री पंचामृत अभिषेक व छबिना मिरवणूक काढली जाणार आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता शाकंभरी नवरात्रातील मुख्य आकर्षण असलेली हजारो सुवासिनी महिलांची जलयात्रा निघेल.
शाकंभरी पौर्णिमा
पौष महिन्यात येणार्या पौर्णिमाला शाकंभरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी शाकंभरी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. हा शाकंभरी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी म्हणूनही ओळखले जाते. शाकंभरी हे पार्वतीचे रूप आहे.
पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवीने हा अवतार घेतला होता, म्हणूनच या दिवसाला शाकंभरी जयंती साजरी केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, शाकंबरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीपासून होते आणि पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होते.
शाकंभरी नवरात्र
प्रत्येक वर्षी पौष महिन्यात ( डिसेंबर / जानेवारी महिन्यात ) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच याही उत्सवाला भाविकांची गर्दी असते. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होत असते. महोत्सव काळात संपन्न होणाऱ्या धार्मिक विधी पैकी बहुतांश धार्मिक विधी हे रात्रीच्या वेळी असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीदेवीजी चे सकाळचे चरणतीर्थ रात्री 1 वाजता होऊन पूजेची घाट व नंतर सकाळी 6:00 वाजता व सायंकाळी 7:00 वाजता अभिषेक पूजा करण्यात येते.
शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व आणि विधी
पौष महिन्याच्या आठव्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करा, नंतर माता शाकंभरीचे ध्यान करा. लाल कपड्यावर घालून आईची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या आईभोवती ठेवा. गंगाजल शिंपडून आईची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर-पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, साखर मिठाई, सुका मेवा यांचा समावेश आहे. मातेची पूजा आणि नियम पाळल्यास व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com