I am satisfied that I did not go there – Sharad Pawar
मी तिकडे गेलो नाही याचं समाधान – शरद पवार
संसदेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणाचा सोहळा हा केवळ मर्यादित घटकांपुरताच – शरद पवार यांची टीका
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशभरात आज नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आज सकाळी पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनाही करण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संसदेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणाचा सोहळा हा केवळ मर्यादित घटकांपुरताच होता, ही वास्तू बांधण्यापूर्वी संसदेत त्याची चर्चाही झाली नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर केली. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
इतका मोठा निर्णय घेताना त्यात सगळ्यांना सहभागी करून घेणं आवश्यक होतं असं ते म्हणाले. माजी प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी आधुनिक विज्ञानावर आधारित नव्या भारताची संकल्पना मांडली होती, आज मात्र नेमकं त्याच्या उलटं सुरु आहे ही हे लोकशाहीला घातक आहे, असं पवार यांनी सांगितलं. आमची बांधिलकी संसदेच्या जुन्या वास्तूशी आहे, असं ते म्हणाले.
मी तिकडे गेलो नाही याचं समाधान; नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावर शरद पवारांची टीका
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला गेलो नाही, याबद्दल मला समाधान वाटत आहे. कारण, त्याठिकाणी ज्या लोकांची उपस्थिती होती, जे काही धर्मकांड सुरु होतं, ते पाहिल्यानंतर या सोहळ्याला न जाण्याच्या निर्णयाबद्दल मला समाधान वाटले, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती आणि आज संसदेत जे काही चाललंय त्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्षे पाठीमागे नेतोय का, याची चिंता वाटायला लागली आहे.
नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाजाची संकल्पना मांडली होती, त्याच्या अगदी उलट चित्र आज संसदेत पाहायला मिळाले, असे शरद पवार यांनी म्हटले. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला साधू, महाराज मंडळी आण्यात आली, याचे मला कौतुक वाटले, अशी उपरोधिक टिप्पणीही शरद पवार यांनी केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com