राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या असल्याची शरद पवार यांची टीका

Sharad Pawar Senior Leader . Chief Nationalist Congress Party हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Sharad Pawar’s criticism that the Governor left all limits while mentioning Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या असल्याची शरद पवार यांची टीका

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Sharad Pawar Senior Leader . Chief Nationalist Congress Party हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

राज्यपाल ही एक संस्था असून त्याच्या काही मर्यादा आणि बंधन असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.

त्या प्रकरणानंतर राज्यपालांनी छत्रपतींच कौतुक करणारं विधान केलं. मात्र, राज्यभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे, असं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले.

विविध विषयांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. तसेच राज्यपालांच्या या विधानाची दखल आता राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी घ्यावी. अशा व्यक्तीकडे राज्यपाल पदासारख्या जबाबदाऱ्या देणं योग्य नाही, असंही पवार म्हणाले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *