Neelam Gorhe claims that the Shinde group will not get the name and symbol of Shiv Sena as per the 10th list of the state constitution
राज्य घटनेच्या १० व्या सूचीनुसार शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळणार नसल्याचा नीलम गोऱ्हे यांचा दावा
मुंबई : भारतीय राज्य घटनेच्या १० व्या सुचीनुसार ज्या बंडखोर आमदारांना आपलं सदस्यत्व रद्द करायचं नसेल तर या सदस्यांना अन्य नोंदणीकृत पक्षात विलीन व्हावं लागेल. अन्यथा हा गट मूळ पक्षापासून विलग झाला नाही असं ग्राह्य धरलं जाईल. आणि तो अपात्र ठरेल, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली.
या बंडखोर गटाला मूळच्या पक्षाच्या नावाचा वापर करता येणार नाही. तेव्हा या गटाला भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षात विलीन व्हावं लागेल. त्यामुळे या गटाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह मिळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणूूक आयोगाच्या नियमानुसार शिवसेनेची घटना तयार करण्यात आली आहे. त्यात कार्याकरिणीची नावं देखील नमूद करण्यात आली आहेत. शिवसेनेचा विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेला ६ टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे या गटाला आगामी निवडणुकांमध्ये या गटाला ४ ते ६ टक्के मतं मिळवावी लागतील. तरंच त्यांना शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मिळेल. अन्यथा मिळणार नाही, असंही त्या म्हणाल्या. कार्याकरिणीवर आमचं बहुमत आहे, असा दावाही त्यांनी केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com