Inauguration of State Level School Field Sports Tournament at Shiv Chhatrapati Sports Complex
शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
पहिला दिवस पुणे आणि कोल्हापूरच्या खेळाडूंनी गाजवला
पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रीया होत असून यामधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होताना खेळाडूंनी आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितपणे यश मिळेल, असे श्री.अकोटकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन किशोर शिंदे, पंच प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर उपस्थित होते.
स्पर्धेच्या प्रारंभी श्री. अकोटकर यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. पुणे विभागाच्या राष्ट्रीय खेळाडू दिव्यांका लांडे व साक्षी सलगर यांनी खेळाडूंना शपथ दिली. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अशा एकुण नऊ विभागातून १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली वयोगटात ११०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत.
आजचे निकालः-
१७ वर्षाखालील मुलेः-
३ हजार मी. धावणे-१) स्वराज जोशी, कोल्हापूर २) हर्षित कदम, कोल्हापूर ३) सचिन भारद्वाज, पुणे
उंचउडी- १) सार्थक निंबाळकर, शिवछत्रपती क्रीडापीठ २) आदेश धंडाळे, शिवछत्रपती क्रीडापीठ ३) आल्हाद राउत, नागपूर
थाळीफेक- १) स्वराज गायकवाड, पुणे २) पुष्कर माळी, कोल्हापूर ३) सोहम थोरात, कोल्हापूर
१७ वर्षाखालील मुलीः-
थाळीफेक- १) भक्ती गावडे, पुणे २) वेदिका जगताप, पुणे ३) सुनिता दगडे, औरंगाबाद
उंचउडी- १) प्रतिक्षा अडसुळे, कोल्हापूर २) आंचल पाटील, मुंबई ३) दर्शना जाधव, कोल्हापूर
३ हजार मी. धावणे- १) जान्हवी हिरुडकर, नागपूर २) शकीला वसाळे, नाशिक ३) साक्षी भंडारी, पुणे
१९ वर्षाखालील मुलेः-
लांबउडी- १) शहानवाझ खान, मुंबई २) ऋषीकेश देठे, पुणे ३) शुभम गोंडे, पुणे
गोळाफेक- १) सुभाष चव्हाण, अमरावती २) शरद बागडी, कोल्हापूर ३) आर्यन आघाव, औरंगाबाद
३ हजार मी. धावणे- १) सुजित तिकोडे, कोल्हापूर २) आदित्य पाटील, कोल्हापूर ३) कुमार जाधव, पुणे
१९ वर्षाखालील मुलीः-
गोळाफेक- १) राजनंदिनी सोनवणे, कोल्हापूर २) किरन नायर, पुणे ३) सुर्याश्री धोंडरकर, नागपूर
३ हजार मी. धावणे- १) सानिका रुपनर, सांगली २) गायत्री पाटील, मुंबई ३) आरती पावरा, नाशिक
लांबउडी- १) कल्पना माडकामी, औरंगाबाद २) गायत्री कासुल्ला, मुंबई ३) मधुरा खांबे, पुणे
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com