शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन

state level school competition gymnastics competition राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जिम्नॅस्टिक्स स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Calling for Sportsmen to Apply for Shiv Chhatrapati State Sports Award

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी, प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.

क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाstate level school competition gymnastics competition राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जिम्नॅस्टिक्स स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.

फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे काही खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत. यास्तव अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये व खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अशा खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत.

पुरस्कारासाठीचे अर्ज आणि माहिती क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहितीही क्रीडा विभागाने दिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *