मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा

Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Shiv Pratap Day was celebrated with great enthusiasm in the presence of Chief Minister Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर

मुंबई : महाबळेश्वर येथील किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केले.

Eknath Shinde एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर भवानी मातेची मनोभावे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आरती केली. छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यांच्या उपस्थितीत आज किल्ले प्रतापगड इथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्यदैवत असून त्यांच्या विचारांनुसार आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यांचे गडकोट, किल्ले हे आपलं वैभव आहे. त्यांचं जतन करण्यासाठी दुर्ग संवर्धन समिती कार्यरत असून त्या माध्यमातून किल्ले संवर्धन होत आहे” असंही ते म्हणाले

यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतापगड इथलं अतिक्रमण काढावं, अशी लोकभावना होती. ते अतिक्रमण काढून आम्ही लोकभावना जपली आहे आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं आहे, असंही ते म्हणाले. राज्यातल्या सर्व गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण आम्ही यापुढेही काढू, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *