Shiv Sena betrayed voters in 2019 assembly elections – Raj Thackeray
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात केला – राज ठाकरे
नागपूर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात केला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
औद्योगिक गोष्टींकडे राज्यसरकारनं अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल त्यांनी, या प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून काय त्रुटी राहील्या हे पाहणं आवश्यक असल्याचं ठाकरे म्हणाले.
मनसेची कार्यकारिणी बरखास्त करणार असून, घटस्थापनेच्या दिवशी नवीन कार्यकारिणी स्थापन करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com