शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Bombay-Mumbai-High-Court

Shiv Sena moves Bombay High Court for permission to hold Dussehra gathering at Shivaji Park

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई: सध्या खरी शिवसेना कोणती? शिंदे गट की, उद्धव ठाकरेंची यावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. अशातच शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना आग्रही आहे. त्यासाठी त्यांनी रितसर महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.Mumbai High Court directs Central Government

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. एका गटाला परवानगी दिली तर वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका महापालिकेने मंगळवारी घेतली होती.

शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी शिवसेनेने अर्ज केला आहे,त्यानंतर स्मरणपत्रही पाठवले आहे. यानंतरही मुंबई महापालिकेच्या विधी विभागानेही दोन्ही गटांच्या अर्जावर अद्याप तरी निर्णय घेतला नाही.

परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी-नॉर्थ येथील कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.

मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती.

अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मागणी केली.

दरम्यान, दसरा मेळाव्याआधी गोरेगावमध्ये आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्य़वस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात आणि पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. एका गटाला परवानगी दिली तर वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका महापालिकेने मंगळवारी घेतली होती.

शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी शिवसेनेने अर्ज केला आहे,त्यानंतर स्मरणपत्रही पाठवले आहे. यानंतरही मुंबई महापालिकेच्या विधी विभागानेही दोन्ही गटांच्या अर्जावर अद्याप तरी निर्णय घेतला नाही.

परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी-नॉर्थ येथील कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *