Shiv Sena MP Sanjay Raut’s house and lands confiscated through ED
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं घर आणि जमिनी ईडीमार्फत जप्त
मुंबई : ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं दादर इथलं राहतं घर आणि अलिबाग जवळच्या ८ जमिनी जप्त केल्या आहेत. हे घर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर तर जमीन वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या संयुक्त मालकीची आहे.
गोरेगावातल्या पत्राचाळीच्या पुनर्विकासातल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रवीण राऊत यांच्या जमिनीही ईडीनं ताब्यात घेतल्या आहेत. या मालमत्तेची एकूण किंमत ११ कोटींहून अधिक आहे.
यावर ‘असत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी ट्विटरवर दिली आहे. यातून काहीही आश्चर्य वाटलेलं नाही. अशाप्रकारची कारवाई होणार हे आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळंच उपराष्ट्रपतींना पत्र लिहून यासंदर्भातली माहिती दिली होती, असं राऊत म्हणाले.
कष्टाच्या पैशातून या मालमत्तेची खरेदी करण्यात आली असून केवळ सूडाच्या राजकारणातून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला.
Hadapsar News Bureau