‘शिवराज्याभिषेक महोत्सव’ भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवाव्यात

Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Send suggestions to make ‘Shivarajyabhishek Mahotsav’ grander, more handsome

‘शिवराज्याभिषेक महोत्सव’ भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवाव्यात

– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई : पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेऊन जाणाऱ्याChhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून शिवराज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनकाळ शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे. यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचवावा आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

min.culture@maharashtra.gov.in या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *