Shravan month Parthiv Shivlingarchan ceremony in the city
शहरात श्रावण मास पार्थिव शिवलिंगार्चन सोहळा
पुणे : परमपूज्य दीक्षित यज्ञमार्तंड श्री. यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराज यांच्या करकमलाद्वारे आपल्या पुणे शहरात श्रावण मास पार्थिव शिवलिंगार्चन सोहळा दिनांक 29 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 या दरम्यान संपन्न होणार आहे.
आनंद सांप्रदायाशी {(दत्त सांप्रदाय) सदानंद मठ, बसवकल्याण} ब्रह्मलीन सोमयाजी दीक्षित श्रीकृष्ण महाराज सेलूकर (यज्ञेश्वर महाराजांचे आजोबा) यांचे पासूनच निगडित आहेत. सांप्रत परमपूज्य दीक्षित यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांनी आज पर्यंत अग्निहोत्र दीक्षा घेऊन 28 सोमयाग संपन्न केलेले आहेत. तसेच सेलूकर परिवाराची मागील 100 वर्षांपासून श्रावण मासात पार्थिव कोटीलिंगार्चनाची अविरत परंपरा आहे.
श्रावण मासात प्रदोष काळी शिवपूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण जाणतोच. त्यानुसार हे शिवपूजन दररोज प्रदोष काळी म्हणजे प्रतिदिन सांयकाळी 4:30 ते 7:30 पर्यंत होणार असून यानंतर आरती संपन्न होईल आणि त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
हा दिव्य भव्य सोहळा सलग १ महिनाभर महेश सांस्कृतिक भवन ,अप्पर इंदिरानगर बस स्टॉप जवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे पार पडणार आहे. आपण सर्वांनी इष्टमित्र भक्तांसह या अत्यंत पावन धर्मकार्यात तन मन धनाने सम्मिलित व्हावे याकरिता हे आग्रहाचे निमंत्रण सेवा समिती द्वारे करण्यात आले आहे.
आपण पूजेसाठी येण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरू शकता – https://forms.gle/SHcNPkVdxhYvvQrCA
अधिक माहिती साठी :
श्रावण मास शिवपूजन सेवा समिती 2022 पुणे.
संपर्क : 9890901788 विवेक अष्टुरकर, 8446584111 मंगेश देशमुख, 9822213283 संजय जी चौधरी, 9422332553 डॉ भागवत खंडाळीकर
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com