Inauguration of Shree Saptakoteshwar temple which is the king deity
राजदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे लोकार्पण
श्री सप्तकोटीश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नी श्रींचरणी अभिषेक सेवा केली अर्पण
ऐतिहासिक वास्तू, मुक्तीसंग्रामातील इतिहास प्रकाशात आणणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या मंदिराचे तसेच तेथील पवित्र तळीचे लोकार्पण होणार आहे
नार्वे : भाविकांच्या साक्षीत आणि विविध धार्मिक विधीसह राजदैवत असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गुरुवारपासून अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देवस्थानला भेट दिली.
शिवकालीन इतिहास असलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नी श्रींवर अभिषेक केला. त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही श्रींवर अभिषेक करून आपली सेवा अर्पण केली.
यावेळी आमदार प्रेमेंद्र शेटहेही उपस्थित होते. श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री फळदेसाई यांनी सप्तकोटेश्वराचरणी आपली सेवा रुजू केली.
नार्वे गावातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर नूतनीकरण हे या सरकारचे मोठे कार्य असून या मंदिराला लगूनच पर्यटन सर्किटची संकल्पना राज्य व केंद्र सरकार साध्य करणार आहे.
हे मंदिर व परिसर सुशोभित करण्याबरोबरच गोवा राज्याचा वैभवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके यांचे नूतनीकरण करून ऐतिहासिक गोवा या राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसमोर ठेवणार आहे.
गोव्यामधील नार्वे, बिचोलिम इथल्या श्री सप्तकोटेश्वर देवस्थानच्या नूतनीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“नार्वे, बिचोलिम इथले नूतनीकरण केलेले श्री सप्तकोटेश्वर देवस्थान, आपल्या युवा पिढीचा आपल्या आध्यात्मिक परंपरांबरोबरचा संबंध अधिक दृढ करेल. त्यामुळे गोव्यातील पर्यटनालाही आणखी चालना मिळेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गोव्यात आध्यात्मिक पर्यटन बहरावे यासाठी ऐतिहासिक, आध्यात्मिक केंद्रांच्या विकासाकडे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सरकार पाऊल पुढे टाकत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नार्वे येथे केले.
नार्वे डिचोली तालुक्यातील ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साताराचे आमदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, देवस्थानचे अध्यक्ष पृथ्वीराज सरदेसाई व इतर मान्यवार उपस्थित होते.
साताऱ्याचे आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले , ‘एक उर्जास्थान म्हणून सप्तकोटेश्वर देवाकडे पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या या जिर्णोद्धारामुळे आज दिसून येत आहे. हे कार्य केवळ दैवी शक्तीमुळे घडू शकते. इतिहासात जाऊन विचार केल्यास साडेतीनशे वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता, त्याच पद्धतीने आजचा सोहळा होत आहे.’ याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना द्यावे लागणार आहे. जनतेचे व धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांप्रमाचेच ते आपले कर्तव्य बजावत आहेत. मंदिरे ही आपली परंपरा आहेत. येथे उर्जा व आशीर्वाद मिळतो.
महाराजांची हिंदवी स्वराज ही संकल्पना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती. म्हणूनच गोव्यातही त्यांच्या कार्याची धग येथेही पहायला मिळत आहे. हा एक वंशज म्हणून आनंद वाटत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील हिंदू मंदिरांची उभारणी जोर धरू लागली आहे. देशात त्यांच्या कार्याप्रमाणेच गोव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे कार्य पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन केले.
गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे. गोव्याच्या पुरातत्व खात्याने जानेवारी २०१९ मध्ये मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मंदिराचे पुरातत्व दृष्टीने महत्त्व अल्प होऊ नये आणि ‘कावी आर्ट’ संरक्षित रहावे, या दृष्टीने चांगल्या सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com