श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाईन

Dagdusheth_Halwai-Ganpati हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Shri Ganesh Atharvashirsha Syllabus

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाईन

पुणे : संस्कृत व प्राकृत विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकमान्य टिळक महाविद्यालय, संस्कृत विभाग व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ‘ श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला आहे.Dagdusheth_Halwai-Ganpati हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सदर अभ्यासक्रम हा कोणत्याही पदवी/पदव्युत्तर पदवीचा आवश्यक भाग नसून, हा अतिरिक्त श्रेयांकाचा सक्तीचा नसलेला निःशुल्क ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. सदर अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली असून, तसे पत्र दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केले आहे.

या अभ्यासक्रमाचा उद्देश भारतीय संस्कृतीमधील संस्कृत स्त्रोत्रांचा अर्थ समजावून सांगणे व त्यामागील शास्त्रोक्त अर्थ/व्याकरण पोहोचवणे असा आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय भाषा, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्ये याचेमधील विविध स्त्रोत्र व वाड:मय अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे.

विविध माध्यमांमध्ये या अभ्यासक्रमाविषयी अभ्यासकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. अभ्यासकांनी या अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास सुयोग्य बदल विद्यापीठ अधिकार मंडळाद्वारे विचार करून करण्यात येतील. या द्वारे सदर अभ्यासक्रम शास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक समृद्ध होईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *