सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री , तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

Senior Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar are contending for the post of Chief Minister काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Siddaramaiah is the Chief Minister of Karnataka, while DK Shivakumar is the Deputy Chief Minister

सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री , तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

डीके शिवकुमार हे राज्याचे एकमेव उपमुख्यमंत्री

नवीन सरकारचा शपथविधी २० मे रोजी होणारSenior Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar are contending for the post of Chief Minister काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील. नवी दिल्लीत माध्यमांना संबोधित करताना पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे राज्याचे एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. ते पुढे म्हणाले की, शिवकुमार हे संसदीय निवडणुका संपेपर्यंत पीसीसी अध्यक्षपदी कायम राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी शनिवारी होणार आहे.

विजयानंतर दक्षिणेचे प्रवेशद्वार संबोधल्या जाणाऱ्या कर्नाटकात मुख्यमंत्री कोणाला करायचे, हे काँग्रेसपुढे मोठे आव्हान होते. चार दिवस कर्नाटक ते दिल्लीपर्यंत बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनाही राजधानीत बोलावण्यात आले होते. अखेर या शर्यतीत सिद्धरामय्या पुढे गेले.

डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या यांच्या मागे पडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर दाखल झालेले खटले. डीके शिवकुमार गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शिवकुमार यांच्यावर 19 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी काही सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत तपासल्या जात आहेत. ते तुरुंगातही गेले आहेत. अशा स्थितीत त्यांना मुख्यमंत्री बनवल्यास आणि एखाद्या संस्थेने त्यांना पुन्हा अटक केल्यास पक्षाला मोठा धक्का बसेल, अशी भीती काँग्रेसला वाटत होती. 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजप या मुद्द्यावर काँग्रेसला कोंडीत पकडू शकते, कारण काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान भ्रष्टाचारावर बोम्मई सरकारवर जोरदार हल्ला केला होता.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महत्त्वाचे खाते देण्याचे आश्वासन काँग्रेस हायकमांडने दिले आहे.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज संध्याकाळी बेंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी संध्याकाळी 7.30 वाजता बैठक बोलावली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे सर्व आमदार, विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटकातील खासदारांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *