कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सिद्धरामय्या यांनी घेतली शपथ

Siddaramaiah was sworn in as CM of Karnataka, सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Siddaramaiah took oath as Chief Minister of Karnataka and DK Shivakumar as Deputy Chief Minister

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सिद्धरामय्या यांनी तर उपमुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांनी घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिद्धरामय्या, शिवकुमार यांचे केले अभिनंदनSiddaramaiah was sworn in as CM of Karnataka, 
सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

बंगळुरू: कर्नाटकच्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटकातले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी आज कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धरामय्या यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी डीके शिवकुमार यांचेही अभिनंदन केले. एका ट्विटमध्ये मोदींनी त्यांना फलदायी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियमवर कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली. त्याचबरोबर काँग्रेसचे विधानसभा सदस्य डाॅ जी परमेश्वर, केएच मुनियप्पा, केजे जाॅर्ज, एमबी पाटील, सतीश जारकिहोली, प्रियंका खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन खर्गे, अभिनेते राजकारणी कमल हसन उपस्थित होते.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे आजच्या पाहुण्यांमध्ये होते.

विविध मुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीने आज एकजुटीचा संदेश दिला.

राज्यभरातून आलेल्या हजारोंच्या संख्येने कांतीरवा स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

200 युनिट मोफत वीज, महिला प्रवाशांना सार्वजनिक बसमध्ये मोफत प्रवास, 10 किलो तांदूळ आणि महिला प्रमुख व पदवीधरांना मासिक भत्ता या पाच आश्वासनांची पूर्तता या कालावधीत केली जाईल, असे सांगण्यात आले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *