Significant increase in the number of passengers travelling through domestic airlines during the year
देशांतर्गत विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरात लक्षणीय वाढ
प्रवाशांची संख्या सध्या ५ कोटी ३ लाख ९२ हजारांपर्यंत
नवी दिल्ली : देशांतर्गत विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत देशांतर्गत विमान कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार प्रवाशांची संख्या सध्या ५ कोटी ३ लाख ९२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही प्रवाशी संख्या ३ कोटी ५२ लाख ७५ हजारांपर्यंत होती. त्यामुळे यात ४२ पूर्णांक ८५ शतांश टकक्यांची वार्षिक वाढ दिसून येते
प्रवासी संख्येतील ही उल्लेखनीय वाढ भारताच्या विमान वाहतूक उद्योगाची मजबूती आणि लवचिकता प्रतिबिंबित करते. संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी आणि आपल्या देशातील नागरिकांना सोयीचे प्रवास पर्याय देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचे हे निदर्शक आहे.
विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताचं स्थान बळकट करण्यासाठी सर्व सहभागींचे एकत्रित प्रयत्न यासाठी महत्त्वपूर्ण ठरले असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. तसचं या उद्योग क्षेत्रातील भरभराटीसाठी आवश्यक वातावरण आणि शाश्वत विकास सुलभ करण्यासाठी सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानकं सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय सहयोग करेल असंही त्यांनी सांगितलं आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com