रेणुका देवीच्या दर्शनासाठी लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचे मंत्री गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

Road Transport and Highways Minister Nitin GadkariRoad Transport and Highways Minister Nitin Gadkari

Bhoomipujan by Minister Gadkari for construction of skywalk with lift for darshan of Renuka Devi

रेणुका देवीच्या दर्शनासाठी लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचे मंत्री गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्णत्वास येत असल्याचा आनंद – मंत्री श्री. गडकरी

कंत्राटदारांनी काम व्यवस्थित न केल्यास बडतर्फीसह कठोर कारवाईचा नितीन गडकरी यांचा इशारा

Road Transport and Highways Minister Nitin GadkariRoad Transport and Highways Minister Nitin Gadkari
File Photo

नांदेड : कंत्राटदारांनी काम व्यवस्थित न केल्यास बडतर्फीसह कठोर कारवाईचा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉक बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यासंदर्भातल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई केल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

नागपूरहून माहूरला पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागत. आज नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले आहे. माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉक बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शेगाव, शिर्डी, तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने तसंच माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, इथली जैवविविधता पाहता नगरपरिषदेने रस्त्याच्या दुर्तफा किमान तीन हजार झाडे लावावीत, माहूर नगरातील प्रत्येक कुटुंबानी किमान तीन झाडे लावावीत, असं आवाहन गडकरी यांनी केलं.

माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या मंचावरुन ते बोलत होते.

नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झालं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

तीर्थक्षेत्राच्या विकासाबरोबर पर्यटन आणि अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते, असं ते म्हणाले. माहूर हे तीर्थक्षेत्र स्वच्छतेच्या दृष्टीनं नावाजलं जावं यासाठी नगरपरिषद आणि माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. माहूर इथं वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डोंगराळ भाग असल्याने पर्यटन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *