Small entrepreneurs are invited to apply for district level awards by November 30
लघुउद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता ३० नोव्हेंबर अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार-२०२२ साठी ३० नोव्हेंबर पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्या कार्यालयात सादर कण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगांची निवड करण्यात येते.
जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग २, उद्योग आधार, उद्यम नोंदणी हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा. (१ जानेवारी २०१९ ची नोंदणी, उद्योग आधार किंवा उद्यम नोंदणी). उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेतील असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी रुपये १५ हजार व द्वितीय पुरस्कारासाठी रुपये १० हजार व मानचिन्ह असे पुरस्कार आहेत.
जिल्हा उद्योग केंद्र येथे अर्ज विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२०-२५५३९५८७, २५५३७५४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com