Bank should cooperate for projects on solar energy for agriculture, health sector
शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली.
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषिपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर ऊर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयूटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com