राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर

Rain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Southwest monsoon winds prevail in the state

राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर

महाराष्ट्राच्या अनेक भागात येत्या २-३ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत पूर्वमध्य आणि वायव्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाजRain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

मुंबई / नवी दिल्ली : राज्यात परवापासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरला आहे. राज्यातल्या काही भागात हलका तर काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पालघर तालुक्यातल्या बोईसर, विक्रमगड, डहाणू, वसई विरार आदी भागात आज सकाळपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. जिल्ह्यात शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. अकोल्यात ढगाळ वातावरण; पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. आणखी दोन दिवसांनी पाऊस पडण्याची शक्तता वर्तवली जात आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे पारा काहीप्रमाणात खाली आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात कपाशी पीक लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, आजपर्यंत सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवड पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात अखेर मान्सूनचे आगमन झालं. नांदगाव बागलाण आणि येवला या तीन तालुक्यात वगळता कमी अधिक प्रमाणात पावसानं सर्वच जिल्ह्यात हजेरी लावली. पेठ आणि त्र्यंबकेश्वर इथं सर्वाधिक पाऊस झाला. नाशिक शहर परिसरात आणि देवळाली इथं रात्री उशिरा झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता.

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत काल सकाळपर्यंत आठ धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत प्रमुख १५ पैकी ८ धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. राधानगरी धरणाच्या परिसरात ८० मिलीमीटर, तर दूधगंगा परिसरात ७० मिलीमीटर पाऊस झाला. पाटगाव धरण परिसरात सर्वाधिक १५२ मिलीमीटर, कुंभी परिसरात ८७ मिलीमीटर, कासारी परिसरात ८३ मिलीमीटर तर कोदे परिसरात ७२ मिलीमीटर पाऊस झाला. घटप्रभा धरण क्षेत्रात ९० मिलीमीटर, तर जांबरे प्रकल्पात ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

येत्या २-३ दिवसात कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग, तसंच विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पालघर, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणातल्या सिंधुदूर्ग वगळता इतर सर्व जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांनाही हवामान विभागानं उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुढील पाच दिवसांत पूर्वमध्य आणि वायव्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

पंजाब, राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मिरचा काही भाग वगळता नैऋत्य मौसमी पावसानं संपूर्ण देशभरात हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मौसमी पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी गेल्या ३ दिवसात त्यानं वेगानं मोठा भूभाग पार केला.

पुढील पाच दिवसांत पूर्वमध्य आणि वायव्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या उर्वरित भागांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना पुढे करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहील आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं आज आणि उद्या दिल्लीत यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आकाश सामान्यतः ढगाळ राहील. काल दिल्लीत नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी पाऊस पडल्यामुळे दिल्लीकरांना दिलासा दिलासा मिळाला आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *