टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री

भारतीय टपाल विभाग India Post logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Sale of special envelopes for Rakhi from post offices’

टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री

भारतीय टपाल विभाग India Post logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Newsनवी दिल्‍ली : रक्षा बंधन हा सण 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होणार आहे. या निमित्त टपाल विभागातर्फे  नागरिकांसाठी अनेक सेवा पुरवल्या जात आहेत.

रक्षा बंधनासाठी टपाल विभागाने विशेष राखी लिफाफे तयार केले आहेत.  टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाच्या कार्यालयाने उच्च दर्जाच्या राखी लिफाफ्यांच्या विक्रीसाठी दिल्लीतील टपाल कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था केली आहे. हे लिफाफे वजनाला हलके, वॉटर प्रूफ, न फाटणारे, मजबूत आणि उत्कृष्ट मुद्रण केलेले आहेत.

या लिफाफ्यांसाठी वापरण्यात आलेला कागद वैशिष्ट्यपूर्ण असून हे लिफाफे पाण्याने खराब होणार नाहीत तसेच ते फाटणार नाहीत. हे राखी विशेष लिफाफे 11 CMS × 22 CMS अशा सोयीस्कर मापाचे असून सहज सील करण्यासाठी पील-ऑफ स्ट्रिप सील यंत्रणेचा वापर केलेले हे  लिफाफे आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.

या राखी लिफाफ्यांची किंमत देखील 15 रुपये प्रति लिफाफा अशी   किफायतशीर आहे. दिल्लीच्या टपाल कार्यालयांमध्ये राखी लिफाफ्यांची विक्री आधीच सुरू झाली आहे.

तुमच्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयात जाऊन राखी लिफाफे खरेदी करून तुम्ही टपाल कार्यालयामधून तुमच्या प्रियजनांना पाठवउ शकता .

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *