Spectacular performance by Police Pipe Band at Hadapsar on the occasion of Amrit Mahotsav of Independence
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हडपसर येथे पोलीस पाईप बँडचे शानदार संचलन
हडपसर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे, हडपसर पोलीसदलाच्या वतीने पाईप बँडचे शानदार संचलन दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. अरविंद गोकुळे तसेच पोलीस दलातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकांनी या शानदार संचलनाचा आनंद घेतला. विद्यार्थी व प्राध्यापकवर्गाने याप्रसंगी तिरंगा धारण करून या सोहळ्याची शान वाढविली. याप्रसंगी संचलन करणाऱ्या पाईप बँडचे सर्वांनी मनःपूर्वक स्वागत केले.
पोलीस पाईप बँडच्या या पथकाचे प्रशिक्षक असई. एम. एन. उगलमुगले, असई. के. पी.कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसदलातील जवानांनी हे संचलन केले. राष्ट्रीय स्तरावर सन २०१६ पासून या बँड पथकाने सलग चार वर्ष सुवर्णपदकाचा मान पटकाविलेला आहे.
‘ए मेरे वतन के लोगो’ ‘हम होंगे कामयाब यांसारख्या देशभक्तीपर गीतांचे सूर याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात निनादले यावेळी उपप्राचार्य अनिल जगताप, उपप्राचार्य प्रा.एम.जे. खैरे, कला शाखा समन्वयक डॉ. प्रवीण ससाणे,धनंजय बागडे, डॉ.जी.पी. सातव, डॉ. शुभांगी औटी, डॉ. सविता कुलकर्णी, प्रा.नितीन लगड, प्रा.अनिता गाडेकर, प्रा. संजीव पवार, हडपसर पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. श्री. चेतन थोरबोले, ए.पी.आय. श्री. सचिन थोरात, पोलीस मित्र श्री दिनेश शिंदे, श्री. समीर पांडूळे, श्री. अमोल मक्राज श्री. सचिन शिंदे, श्री. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com