SSC Board exam starts from tomorrow
इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
एकूण ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी महत्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये अंतर ठेवण्यात आलं आहे. परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक परीक्षा कालावधीत बैठं पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत.
या दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन विभागीय मंडळ स्तरावरून करण्यात येणार असून ज्या त्या पेपरच्या दिवशी सकाळी संबंधित भरारी पथकांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com