ST movement partially canceled in Maharashtra-Karnataka border area
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतमधील गावांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राज्यांमधील सीमाभागावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळला आलाय. त्यातच काल बेळगावध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कर्नाटकच्या बसेसना काळे फासले.
त्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच सीमा भागातील वाढता तणाव लक्षात घेता स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने तणाव असलेल्या भागातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस रद्द करण्याच्या सूचना केल्या.
महाराष्ट्र – कनार्टक सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एसटी महामंडळानं आपल्या, कर्नाटकात जाणा-या दैनदिन १ हजार १५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या पुढची सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या आहेत.
कोल्हापूर शहरातून सौंदत्ती येथे सुमारे ७ हजार भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी गाड्या आज मध्यरात्रीपर्यत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील.
या बाबतीत आवश्यकता वाटला तर या गाड्यांना पोलीस संरक्षण देण्याचं आश्वासन कनार्टक पोलीस प्रशासनानं दिलं आहे.
सोलापूर जिल्हयाच्या सीमावर्ती भागात कर्नाटकमधे गाणगापूर इथं दत्त जंयती निमित्त यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर- अक्कलकोट- गाणगापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तिथं कोणतंही विघ्न आलेलं नसून, यात्रा सुरळीत सुरु आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com