Nitin Gadkari hopes that start-ups should start according to local needs
पुणे : स्थानिक गरजेनुसार स्टार्ट अप सुरू व्हावेत, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
पुणे : स्थानिक गरजेनुसार स्टार्ट अप सुरू व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क च्या मदतीनं स्टार्ट अप उद्योगांनी सुरू
केलेल्या पर्यावरणाशी सुसंगत उत्पादनांचं अनावरण आज गडकरी यांच्या हस्ते पुण्यात झालं. त्यावेळी ते बोलत होते.
पुणे हे वाहन उद्योग क्षेत्रातल्या उत्पादनांचं प्रमुख केंद्र बनावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रामुख्यानं जैविक आणि इथेनॉल वर आधारित पर्यावरण पूरक इंधनावर चालणाऱ्या गाड्या भविष्यात निर्माण होणार असल्यानं नवउद्योजकांनी त्यादृष्टीनं संशोधनावर भर द्यावा, विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय हवा, असं ते म्हणाले.
आज वितरण झालेल्या स्टार्ट उप उत्पादनात प्रामुख्यानं जैव इंधन आणि विजेवर चालणारी ई जिप्सी. बहुउपयोगी ई स्कूटर आणि रोबोटिक शेती अवजार यांचा समावेश आहे.
पुण्यातल्या विमानतळाचा प्रश्न तूर्त तरी चंदीगडच्या धर्तीवर सोडवला जाणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
नवीन विमानतळाचा प्रश्न लगेचच मार्गी लागण्याची शक्यता नसल्यानं सध्या तरी हवाई दलाकडून अतिरिक्त जागा घेऊन सध्याच्याच लोहगाव विमानतळाचा विस्तार केला जाईल.
हवाई दल प्रमुखांशी त्याबद्दल चर्चा झाली असून, येत्या आठवड्याभरातच आपण अतिरिक्त जागेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो