State Bank of India launched the WhatsApp banking service for the convenience of its customers
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा
नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा चालू केली आहे.
ग्राहकांनी ९०२२६९०२२६ या मोबाईल क्रमांकावर हाय असा संदेश पाठवल्यास एसबीआय वॅाटस्अप बॅंकींग सेवा उपलब्ध होईल. या सेवेद्वारे ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम, वॅाटस्अपवर मिनी स्टेटमेंट पाहू शकतील. यासाठी त्यांना अँप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आपल्या क्रेडीट कार्ड धारकांना वॅाटस्अप कनेक्ट नावानं प्लॅटफॉर्मद्वारे वॅाटस्अप आधारीत सेवा देणार आहेत. यामुळे एसबीआय कार्ड धारक त्यांच्या खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंटस् थकबाकीची रक्कम तपासू शकतील आणि कार्ड पेमेंटही करू शकतील.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com