State Cabinet to be expanded before Winter Session of Legislature – Deputy Chief Minister
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार – उपमुख्यमंत्री
मुंबई : नागपूर इथं येत्या १९ डिसेंबरपासून होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य त्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, वर्षे कोरोना साथरोगामुळे गेली 2 वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदा 2 आठवडे अधिवेशन निश्चितपणे चालेल.
राज्य सरकारची तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे. जर आमदारांची इच्छा असेल तर त्यांचे नववर्ष नागपुरात साजरे होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाविकास विकास आघाडीची सत्तापालट करत सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आतापर्यंत केवळ एकाच महामंडळाचं अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं असून, लवकरच काही आमदार तसंच पक्षाच्या नेत्यांची महामंडळावर देखील नियुक्ती केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या 9 आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली होती तर भाजपच्या 9 आमदारांना संधी देण्यात आली होती. दोन्ही गटांकडे समान मंत्री असल्याने दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यामुळे बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या गटातील काही मंत्री नाराज झाल्याने धुसफूस सुरू आहे .दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेेद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर दुसरा मंत्रीमंडळ होण्याची शक्यता आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com