Distribution of State Cultural Awards on Monday
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण
पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत “उत्सव महासंस्कृतीचा” चे आयोजन
मुंबई : नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या कलेच्या विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने दि.१० एप्रिल २०२३ रोजी कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये एक लक्ष, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सन्मानित केले जाणारे मान्यवर:
नाटक : कुमार सोहोनी(2020) गंगाराम गवाणकर (2021), कंठसंगीत : पंडितकुमार सुरशे (2020) कल्याणजी गायकवाड (2021),उपशास्त्रीय संगीत : शौनक अभिषेकी (2020) देवकी पंडीत (2021),चित्रपट ( मराठी) : मधु कांबीकर (2020) वसंत इंगळे (2021), किर्तन : ज्ञानेश्वर वाबळे (2020) गुरुबाबा औसेकर (2021),शाहिरी : अवधूत विभूते (2020) कै. कृष्णकांत जाधव(मरणोत्तर) (2021),नृत्य : शुभदा वराडकर (2020) जयश्री राजगोपालन (2021),कलादान : अन्वर कुरेशी (2020) देवेंद्र दोडके (2021),वाद्यसंगीत : सुभाष खरोटे (2020) ओंकार गुलवडी (2021), तमाशा : शिवाजी थोरात (2020) सुरेश काळे (2021),लोककला : सरला नांदुरेकर (2020) कमलबाई शिंदे (2021),आदिवासी गिरीजन : मोहन मेश्राम (2020) गणपत मसगे (2021) या मान्यवरांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या पुरस्कार प्रसंगी उत्सव महासंस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कार्तिकी गायकवाड, संदेश उमप, संपदा माने, संपदा दाते, शाहीर संतोष साळूंखे, संघपाल तायडे तसेच शिल्पी सैनी आदी कलाकारांचे नृत्य, नाटय, भक्ती, संगीत, रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण होणार आहे.
या कायक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महाराष्ट्राच्या कलारत्नांचा सन्मान करण्यासाठी तसेच यासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com