देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर जाईल – मा. मुरलीधर मोहोळ

State will progress under the leadership of Devendraji – Hon. Muralidhar Mohol

देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर जाईल – मा. मुरलीधर मोहोळ

नेत्रतपासणी सोबत मोफत शस्त्रक्रिया हे खरे सेवाकार्य – मा.राजेश पांडे

क्रिएटिव्ह फाउंडेशन व नयनतारा आय क्लिनिक तर्फे 13 नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष असून गत अडीच वर्षे राज्याची अधोगती झाली असून आता त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर जाईल असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे नयनतारा आय क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित नेत्रतपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिबीर संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,मुकुलमाधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे,नयनतारा आय क्लिनिक चे डॉ. अनिल परांजपे, डॉ. मेधा परांजपे, ई मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू व्यक्तींची संपूर्ण आरोग्य तपासणी हे स्पृहणीय कार्य असून कोरोना काळानंतर नागरिकांमध्ये आरोग्यप्रति जागरूकता वाढली आहे, मात्र महागड्या औषधोपचारामुळे आणि स्वतःच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात, विशेषत: वस्ती विभागात हे प्रकर्षाने जाणवते त्यामुळे मोफत आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे मत ही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

नेत्रतपासणी सोबत गरजू व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येत असून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन चे हे खरे सेवाकार्य असल्याचे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.

शासकीय यंत्रणेतून आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्या तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक ह्या सुविधांपासून वंचित आहे, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन ह्या सुविधा वस्ती विभागातील प्रत्येकाच्या दारापर्यंत नेणे कौतुकास्पद असल्याचेही राजेश पांडे म्हणाले.

आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहर भाजपा ने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करून देवेंद्रजींना यथायोग्य शुभेच्छा दिल्या आहेत असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन यापुढील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य संपन्नतेसाठी कार्य करणार असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच आज 13 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याचे ही खर्डेकर म्हणाले. त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावना हीच आमच्या कामाची पावती असून त्यांनी देवेंद्रजींना दिलेले आशीर्वाद मौल्यवान असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.

यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डॉ. अनिल परांजपे, डॉ. मेधा परांजपे, आणि डॉ. मधुरा आचवल यांचा सत्कार करण्यात आला. संयोजन व प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *