सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसकडून राज्यभर निदर्शनं

Statewide protests by Congress against ED probe of Sonia Gandhi सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसकडून राज्यभर निदर्शनं हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Statewide protests by Congress against ED probe of Sonia Gandhi

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसकडून राज्यभर निदर्शनं

मुंबई /नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणाची (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालय (ED) पुन्हा चौकशी करत आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना समन्स बजावण्यात आलंय. यापूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली आहे.  तर, दुसरीकडं काँग्रेसनं पुन्हा एकदा देशभरात ताकद दाखविण्याची घोषणा केलीय. त्याअंतर्गत आज दिल्ली, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. Statewide protests by Congress against ED probe of Sonia Gandhi सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसकडून राज्यभर निदर्शनं हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मोदी सरकारच्या इशाऱ्यावरुन ईडीमार्फत चौकशी केली जात असून, २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष सरकारला धारेवर धरत असल्यामुळे त्यांना त्रास दिला जात आहे. त्याविरोधात कॉंग्रेस आरपारची लढाई लढेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुण्यामध्ये काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत आंदोलन करणाऱ्या नाना पटोले, भाई जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. राज्यातही विविध ठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं.

केंद्रातील मोदी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर करत असल्याचा आरोप करत पुणे शहर काँग्रेसकडून (Congress) आंदोलन करण्यात आलं.
आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *