Submit the report on fee waivers given to students
विद्यार्थ्याना दिलेल्या शुल्कमाफीचा अहवाल सादर करा
पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश
पुणे : कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई किंवा वडील गमावले अशा विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे असे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न
महाविद्यालयांना दिले आहेत. मात्र तरीही काही विद्यार्थी, पालक व संघटनांकडून शुल्कमाफीबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वूमीवर संलग्न महाविद्यालयांनी ३१ जुलैपर्यंत दिलेल्या शुल्कमाफीबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक काढत दिले आहेत.
पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केली होती. मात्र तरीही काही महाविद्यालयांनी ही शुल्कमाफी दिली नसल्याने पालक, विद्यार्थी व संघटनांनी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांच्या नावासह तक्रार केली आहे. महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर याची दखल घेत शुल्कमाफी द्यावी व त्याचा अहवाल ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाकडे पाठवावा असेही विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com