Successful Firing of the extended-range version of Brahmos Air Launched Missile from SU-30 MKI Aircraft
सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानातून हवेत मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ला आवृत्तीचे यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली : भारताने आज सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानातून हवेत मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. विमानातून प्रक्षेपण नियोजित करण्यात आले होते आणि क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील निर्धारित लक्ष्यावर थेट मारा केला.
‘सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीचे हे पहिले प्रक्षेपण होते.भारतीय हवाई दलाने सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानातून जमिनीवर/समुद्रावर खूप दूर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.
भारतीय हवाई दल , भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड यांनी समर्पित आणि एकत्रित प्रयत्नांनी हे यश साध्य करण्यासाठीची देशाची क्षमता सिद्ध केली आहे.
क्षेपणास्त्राची विस्तारित पल्ला क्षमता आणि सुखोई – 30 एमकेआय विमानाच्या उच्च कार्यक्षमतेमुळे भारतीय हवाई दलाला एक सामरिक पोहोच आणि भविष्यात युद्धक्षेत्रांवर वर्चस्व राखण्यासाठी क्षमता प्राप्त होईल.
हडपसर न्युज ब्युरो