साखर कारखान्यांकडून यंदाच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती

Image of Sugar Factory Hadapsar News साखर कारखाना हडपसर मराठी बातम्या

Sugar mills are likely to produce ethanol on a large scale this fall season

साखर कारखान्यांकडून यंदाच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रातील उसाचा यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला असून इंधनातील इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र शासनाच्या धोरणामुळं या हंगामात कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.Image of Sugar Factory Hadapsar News साखर कारखाना हडपसर मराठी बातम्या

यावर्षी 14.87 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यावर्षीही ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळं यंदा साखरेच्या उत्पादन देखील वाढणार आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामात 200 हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार आहेत.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 8 वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण 20 टक्के करण्याचा निर्धार केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

शिवाय काही गाड्या 100 टक्के इथेनॉलवर चालवण्याच्या दृष्टीनंही संशोधन सुरु असल्यानं आगामी काळात इथेनॉलची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊनच राज्यातील 141 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरु केले आहेत.

यंदा इथेनॉलच्या उत्पादनात देखील मोठी वाढ होणार आहे. यंदा राज्यात 119 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होणार असल्याची माहिती साखर आयुक्त गायकवाड यांनी दिली.

पुढच्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये 140 कोटी लिटरहून अधिक इथेनॉल निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचाही प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

अनेक कारखाने उसाच्या मळीपासून इथेनॉल बनवण्याऐवजी थेट उसाच्या रसापासूनच इथेनॉल बनवण्यावर भर देत आहेत. त्यामुळं इथेनॉलची गुणवत्ता अधिक वाढत असून या इथेनॉलला बाजारात चांगला दर मिळत आहे.

संबंधित बातम्या

ऊसापासून साखर निर्मितीऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याचा नितीन गडकरी यांचा साखर कारखान्यांना सल्ला

साखर कारखान्यांनी अधिक इथेनॉल निर्मिती करण्याची गरज – नितीन गडकरी

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *