Supreme Court refuses to postpone PG exam
नीट पीजी परीक्षा पुढं ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीची नीट पीजी परीक्षा पुढं ढकलायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
परीक्षा पुढे ढकलत राहिल्यास देशात प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टंचाई निर्माण होऊ शकते, आणि वैद्यकीय सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने आदेशात म्हटलं आहे.
परीक्षा प्रक्रीयेत यामुळे अव्यवस्था माजेल आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
कोविड महामारीमुळे कोलमडून पडलेलं परीक्षांचं वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं असून आपण ठरवून दिल्याप्रमाणेच परीक्षा घ्याव्या असं बजावलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो