पन्नास परदेशी विद्यार्थ्यांसह दोन हजार विद्यार्थी धावणार ‘संविधान सन्मान दौड’

Savitribai Phule Pune Universiy

2000 students along with 50 foreign students will run ‘Svidhan Samman Daud’

पन्नास परदेशी विद्यार्थ्यांसह दोन हजार विद्यार्थी धावणार ‘संविधान सन्मान दौड’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती

विजेत्यांना मिळणार पारितोषिके

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान दौड’ चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबतच पन्नास हून अधिक परदेशी विद्यार्थी धावणार आहेत. या दौडला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.Savitribai Phule Pune University

याबाबतची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे संचालक डॉ.विजय खरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.खरे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या संविधानाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने या संविधान सन्मान दौडचे आयोजन केले आहे.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून या दौडची सुरुवात होणार आहे. यावेळी चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या दौडला सकाळी ५.३० वाजता सुरुवात होईल.

यामध्ये विविध देशांतील विद्यार्थी, सैन्यदलातील अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुण्यातील अनेक मान्यवर देखील या दौडमध्ये सहभागी होतील.

वाडेकर म्हणाले, ही दौड तीन प्रकारच्या वयोगटानुसार आयोजित केली आहे. ज्यात १६ वर्षाखालील मुलामुलींसाठी ३ किलोमीटर, २० वर्षाखालील मुलामुलींसाठी ५ किलोमीटर आणि खुल्या गटात सर्वांसाठी १० किलोमीटर ची दौड असणार आहे. यामध्ये कमीत कमी तीन हजारपासून ते जास्तीत जास्त १५ हजारपर्यंत पारितोषिके देण्यात येणार आहेत. दौड पूर्ण झाल्यानंतर अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते लगेचच विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.

या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत https://forms.gle/HNFJygxiJnBbGFTz9 या लिंक वर जात नावनोंदणी करावी असे आवाहन वाडेकर यांनी केले.

दहा किलोमीटर प्रकारासाठी मार्ग

प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारती शेजारील संविधान स्तंभ -आयुका रोड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड- डावीकडे वळून राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडी येथे वळसा मारून – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड -येथून डावीकडे वळून -खडकी स्टेशन -उजवीकडे पार्क रोड वरून कालीबारी समिती -जनरल जोशी प्रवेशद्वार -विद्यापीठ लेडीज हॉस्टेल -डावीकडे वळून मुख्य प्रवेशद्वार -छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – मुख्य इमारत संविधान स्तंभ येथे समारोप.

पाच किलोमीटर प्रकारासाठी

प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारती शेजारील संविधान स्तंभ -आयुका रोड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड- डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बोपोडी येथे वळून – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड -उजवीकडे वळून एन सी आर ए आयुका गेट-उपकुलगुर निवासा समोरुन-विद्यापीठ लेडीज हॉस्टेल -डावीकडे वळून मुख्य प्रवेशद्वार -छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – मुख्य इमारत संविधान स्तंभ येथे समारोप.

तीन किलोमीटर प्रकारासाठी

प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारती शेजारील संविधान स्तंभ -उपकुलगुरू निवासस्थान -आयुका गेट-उजवीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-उजवीकडे वळून-पुन्हा आयुका गेट-उपकुलगुरू निवासाकडून उजवीकडे – मुख्य इमारत संविधान स्तंभ येथे समारोप.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

 

Spread the love

One Comment on “पन्नास परदेशी विद्यार्थ्यांसह दोन हजार विद्यार्थी धावणार ‘संविधान सन्मान दौड’”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *