Swachh Toyathon’ competition to make toys from waste started
कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेला सुरुवात
नवी दिल्ली : भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने, राष्ट्रीय खेळणी कृती आराखडा 2020-एनएपीटी जाहीर केला आहे. यात पारंपरिक हस्तकौशल्ये आणि हातांनी तयार केलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन देण्याचाही विचार असून त्याद्वारे भारताला खेळणी उद्योगांचे जागतिक केंद्र बनवण्याचा उद्देश आहे.
उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने,केंद्र सरकारच्या 14 मंत्रालयांसह ह्या एनएपीटी च्या अंमलबजावणीचे काम सुरु केले आहे.
भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, तसेच देशांत युवा लोकसंख्येचं प्रमाण अधिक, म्हणजे देशातली अर्धी लोकसंख्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.
अर्थव्यवस्थेत होत असलेल्या प्रगतीमुळे लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, आजकाल मुलांसाठी अभिनव खेळणी तयार केली जात आहे. ह्या सगळ्या कारणांमुळे देशांत खेळण्यांची मागणी देखील वाढते आहे.
एकीकडे देशांत खेळण्यांची मागणी वाढते आहे, तसेच दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, ह्या दोन्ही समस्यांवर एकच समाधान शोधण्यासाठी ‘स्वच्छ टॉयकॅथोन’ ही अभिनव कल्पना राबवली जाणार आहे.
कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचा प्रारंभ आजपासून होत आहे. टाकाऊ वस्तू वापरुन खेळणी बनवण्याची ही अनोखी स्पर्धा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आयोजित केली आहे.
सुक्या कचऱ्याचा वापर करून खेळण्यांच्या रचनेमध्ये नावीन्य आणण्यासाठी वैयक्तिक तसंच सांघिक गटांसाठी, ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेतून तयार झालेल्या चांगल्या नमुना खेळण्यांपासून पुढे किमान सुरक्षा मानकांचं पालन करणारी खेळणी मोठ्या प्रमाणात बनवली जाणार आहेत.
आय आय टी गांधीनगर च्या ‘सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग’ या संस्थेनं MyGov च्या ‘इनोव्हेट इंडिया’ पोर्टलवर ही स्पर्धा आयोजित केली आहे.
देशातील आर्थिक विकास, उत्पन्नात झालेली वाढ आणि लहान मुलांसाठी पुढे आलेल्या अनेक नवनवीन कल्पनांमुळे खेळण्यांची मागणी वाढत आहे. ‘खेळण्यांसाठी राष्ट्रीय कृती योजना २०२०’ ही भारताला जागतिक खेळण्यांचं केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि पारंपारिक हस्तनिर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली.
“स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत” ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.17 सप्टेंबर-सेवा दिवस ते 2 ऑक्टोबर 2022 स्वच्छता दिवस या पंधरवड्यात हा महोत्सव साजरा केला जात आहे.
“माय गव्ह इनोव्हेट इंडिया” पोर्टल वरुन ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com