स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ उद्यापासून ‘दूरचित्रवाणी’ वर प्रसारित होणार

Swaraj – The Comprehensive Story of India's Freedom Struggle' will be telecast tomorrow on TV स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ उद्यापासून ‘दूरचित्रवाणी’ वर प्रसारित होणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Swaraj – The Comprehensive Story of India’s Freedom Struggle’ will be telecast from tomorrow on TV

स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ उद्यापासून ‘दूरचित्रवाणी’ वर प्रसारित होणार

नवी दिल्ली  : ‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दूरचित्रवाणीवर दर रविवारी रात्री 9 ते 10  या वेळेत प्रसारित केली जाईल. या मालिकेचा पहिला भाग उद्या 14 ऑगस्ट 2022 रोजी दाखविण्यात येणार आहे.Swaraj – The Comprehensive Story of India's Freedom Struggle' will be telecast tomorrow on TV  स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ उद्यापासून ‘दूरचित्रवाणी’ वर प्रसारित होणार हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

‘स्वराज – द होल स्टोरी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही एक मेगा ऐतिहासिक लघुपट मालिका आहे. 15 व्या शतकापासून ते 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्भीड, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविण्याला जाईल.

ही मालिका फक्त  इंग्रजांनी केलेल्या  अन्यायावर नाही तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या 75 ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे. या मालिकेत राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा, गणेश आणि विनायक सावरकर, नाना साहेब आणि बाजीराव पेशवे, तसेच राणी आबक्का, बक्षी जगबंधू, तिरोत सिंग, सिद्धो कांथो मुर्मू, यासारख्या सुप्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या गाथांचा यात समावेश असणार आहे. यासह शिवाप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांसारख्या कमी ज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या कथाही प्रसारित केल्या जातील.

ही मालिका 4K/HD सारख्या उच्च प्रणाली गुणवत्तेसह आणि विस्तृत संशोधनानंतर तयार केली गेली आहे. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. लोकप्रिय चित्रपट अभिनेते मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका साकारली आहे.

स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढयाची सर्वसमावेशक कथा’ 20 ऑगस्टपासून मराठीतून प्रसारित होणार

20 ऑगस्टपासून सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून ‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य  लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका मराठीत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेसह  इंग्रजी , तमिळ, तेलुगू, मल्याळम,  कन्नड, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी  अशा 8 प्रादेशिक भाषांमध्येही 20 ऑगस्टपासून रात्री 8 ते 9 वाजता  प्रादेशिक वाहिन्यांवरून  प्रसारित केली जाईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *