T20 विश्वचषक: भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी दणदणीत विजय

Cricket-Image

T20 World Cup: India beat Netherlands by 56 runs

T20 विश्वचषक: भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी दणदणीत विजय

रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव  यांची अर्धशतके

सिडनी : ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकात, भारताने नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सची फलंदाजी भारताच्या  गोलंदाजीपुढे ढासळली. भारताकडून अर्शदीप, भुवनेश्वर, अश्विन आणि अक्षर यांनी प्रत्येकी २ तर शमीने १ बळी घेतला.

Cricket-Image
Image Source Pixabay.com

या विजयासह भारताचे चार गुण झाले, याचबरोबर ग्रुप 2 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थान देखील पटकावले.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (53), विराट कोहली (नाबाद 62) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 51) यांच्या साथीने भारताने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले – सर्वांनी चमकदार अर्धशतके झळकावली.

2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध सूर्यकुमारने अर्धशतक झळकावले, सूर्यकुमारने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याच्या या खेळीसोबतच त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने पाच वेळा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे

नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन (1/33) आणि पॉल व्हॅन मीकरेन (1/32) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सची फलंदाजी भारताच्या  गोलंदाजीपुढे ढासळली. नेदरलँडचा संघ 20 षटकांत केवळ 123 धावाच करू शकला.

संघाकडून सर्वाधिक धावा मधल्या फळीतील फलंदाज टिम प्रिंगलने केल्या. प्रिंगलने 15 चेंडूंचा सामना केला आणि एका चौकार आणि षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या.

भारताकडून अर्शदीप, भुवनेश्वर, अश्विन आणि अक्षर यांनी प्रत्येकी २ तर शमीने १ बळी घेतला

संक्षिप्त धावसंख्या:

भारत: 20 षटकांत 2 बाद 179 (विराट कोहली नाबाद 62, रोहित शर्मा 53, सूर्यकुमार यादव नाबाद 51; पॉल व्हॅन मीकरेन 1/32).

नेदरलँड्स: 20 षटकांत 9 बाद 123 (टिम प्रिंगल 20; भुवनेश्वर कुमार 2/9, अक्षर पटेल 2/18, रविचंद्रन अश्विन 2/21, अर्शदीप सिंग 2/37).

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *