T20 World Cup semi-final: India take on England in Adelaide; Pakistan will face New Zealand
टी-20 विश्वचषक क्रिकेट उपांत्य फेरी: भारताची इंग्लंडशी अँडलेडमध्ये लढत; पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार
मेलबर्न : ICC टी-20 विश्वचषक क्रिकेट उपांत्य फेरीत 9 नोव्हेंबरला न्यूझीलंडचा सामना सिडनी येथे पाकिस्तानशी होईल आणि 10 नोव्हेंबरला अँडलेडमध्ये भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होईल. उपांत्य फेरीतील विजेत्यांचा सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे होणाऱ्या अंतिम लढतीत होईल.
आज भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. मेलबर्न येथे भारताने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 17.2 षटकांत 115 धावा करता आल्या.
रविचंद्रन अश्विनने चार षटकांत 22धावांत 3 बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांनी पहिल्या दोन षटकात प्रत्येकी एक विकेट घेतली. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने त्यांच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. अश्विनने 35 धावांवर बर्लला क्लीन आउट करण्यापूर्वी रायन बर्ल आणि सिकंदर रझा यांनी थोडा प्रतिकार केला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सूर्यकुमार यादवनं 25 चेंडूंत नाबाद 61 धावा केल्या तर सलामीवीर राहुलनं35 चेंडूत 51 धावा फटकावल्या मुळे
भारताने 20 षटकात 5 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.
IND 186/5 (20)
ZIM 115 (17.2)
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com