शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन ज्ञानप्रवाही रहावे

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Teachers should be trained and knowledgeable

शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन ज्ञानप्रवाही रहावे

रयत शिक्षण संस्था व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, (IISER) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

हडपसर : विज्ञान विषयाचे शिक्षक हे प्रयोगशील असतात त्यांनी कृतीवर आधारित शिक्षण तसेच प्रकल्पाधारीत व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अध्यापन केले पाहिजे. शिक्षकांनी वेगवेगळी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे ज्ञान अद्ययावत करावे.तसेच या प्रशिक्षणामधून मिळणाऱ्या कौशल्यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करावे.तसेच शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन ज्ञानप्रवाही रहावे .

येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार रयत शिक्षण संस्था कार्य करीत Rayat Shikshan Sanstha, Sataraआहे’, असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्था व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, (IISER) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनियर कॉलेज कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य दत्तात्रय जाधव बोलत होते.

या प्रशिक्षणा वर्गाच्या उद्घाटनासाठी समन्वयक डॉ. प्रज्ञा पुजारी, शिवानी पुलसे , एस. एम. जोशी महाविदयालयचे प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड ,साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, विद्यालयाचे उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

यावेळी आयसर समन्वयक डॉ. प्रज्ञा पुजारी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या ‘कार्यशाळा ताण-तणाव घेण्यासाठी नसतात तर स्वतःला अद्ययावत करण्यासाठी असतात. प्रशिक्षण विद्यार्थ्यांमध्ये रुजवून नवीन शोधक, Inventor तयार करण्यास सांगितले.

एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये blended learning पद्धत वापरणे, अध्यापन करतांना प्रत्यक्ष व्हिडीओ किंवा प्रतिकृती किंवा प्रात्यक्षिक करून दाखवावे. तसेच सॉफ्टवेअर चा वापर करून आपल्या नवनवीन कल्पना विकसित करणे आवश्यक आहे. विविध अँप तयार करून startup तयार करणे गरजेचे आहे व विदयार्थ्यांना एकाच शाखेत मर्यादित न ठेवता त्यांना बाहेरच्या जगात मोकळी संधी द्यावी’,

त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना, ‘सुरुवातीला सर्व शिक्षकांचे स्वागत केले.कार्यशाळेच्या उद्घाटनाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख धनाजी सावंत यांनी केले.तर आभार नितीन महामुनी यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *