Call for nominations for the Tenzing Norge National Courage Award
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराकरीता नामांकन सादर करण्याचे आवाहन
पुणे : साहसी उपक्रमामध्ये उत्कृष्ठ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी https://awards.gov.in/ या संकेतस्थळावर १४ जुलै पर्यंत नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षातील कामगिरी असावी. खेळाडूंनी केलेली कामगिरी व त्याबाबत आवश्यक असणारी सर्व माहिती, कागदपत्रे, प्रमाणपत्रे प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अति उत्कृष्ठ असणे आवश्यक असून त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानांमध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल परिसर, शास्त्री नगर, येरवडा, पुणे येथे किंवा ९५५२९३१११९ या भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराकरीता नामांकन सादर करण्याचे आवाहन”