पहिल्या दिवसअखेर भारताच्या सहा बाद २७८ धावा

Cricket-Image

Test cricket between India and Bangladesh; At the end of the first day, India was 278 for six

पहिल्या दिवसअखेर भारताच्या सहा बाद २७८ धावा

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या सहा बाद २७८ धावा

श्रेयस अय्यरच्या नाबाद ८२

चट्टग्राम : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात सहा बाद २७८ धावा झाल्या.

Cricket-Image
Image Source Pixabay.com

चट्टग्राम इथं आज सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या साम्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. कर्णधार के एल राहुलनं २२, तर शुभंम गिलनं २० धावा केल्या. विराट कोहली १ धाव काढून तंबूत परतला.

ऋषभ पंतनं ४१ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी भागीदारीमुळे भारतच्या धावसंख्येला आकार मिळाला. मात्र, पुजाराचं शतक हुकलं. तो ९० धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ आलेला अक्षर पटेल १४ धावा काढून तंबूत परतला. श्रेयस अय्यरच्या नाबाद ८२ धावा झाल्या आहेत.

बांगलादेशकडून तैजुल इस्लामने तीन, खालेद अहमदने एक आणि मेहदी हसन मिराझने दोन गडी बाद केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *