भांडारकर संस्थेद्वारा ‘स्वप्नवासवदत्तम’ या प्राचीन नाट्याचे पुनर्निर्माण

हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Reproduction of the ancient drama Swapnavasavadattam by the Bhandarkar Institute

भांडारकर संस्थेद्वारा ‘स्वप्नवासवदत्तम’ या प्राचीन नाट्याचे पुनर्निर्माणहडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : प्राचीन कवी भास यांनी सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तम या नाट्यकृतीचे संगीतमय नृत्य-नाट्यात रुपांतरण करण्याचे अवघड काम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज येथे दिली.

येत्या शनिवारी (25 फेब्रु) सायं. 6.30 वाजता संस्थेच्या समवसरण या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये या नाट्याचा शुभारंभाचा प्रयोग होणार असून मुग्धा पोतदार-पाठक यांचे दिग्दर्शन यासाठी लाभले आहे.

यावेळी बोलतांना पटवर्धन म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये, इतिहासात अशा असंख्य अद्वितीय साहित्यकृती आहेत, ज्याची नव्याने ओळख करुन देण्याची गरज आहे. भांडारकर संस्था त्यादृष्टीने विविध प्रयत्न करीत असते. आपल्या प्राचीन इतिहासात अनेक विद्वानांनी अमूल्य ठेवा आपल्यासाठी भरभरुन दिलेला आहे, त्याचे जतन आणि त्याचे सादरीकरण देखील आजच्या पिढीसाठी आवश्यक आहे.

स्वप्नवासवदत्तम हे समकालीन स्वरूपातील एक आकर्षक नाटक आहे जे तुम्हाला त्या युगात घेऊन जाते. यात कथेचे विविध पैलू – सौंदर्य, कला, प्रेम, राजकारण आणि देशभक्ती नृत्यनाट्याच्या रूपात दाखवण्यात आली आहे. हे एक अनोखे सादरीकरण आहे. कथा, दिवे, संगीत, वेशभूषा, दागिने आणि सेट प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेले आहेत.

स्वप्नवासवदत्तम ही नाट्यकृती आम्ही हिंदी भाषेतून सादर करीत आहोत. भांडारकर संस्थेत तसेच ऑनलाईन https://www.ticketkhidakee.com/ (तिकीटखिडकी डॉट कॉम) पध्दतीने प्रवेशिका (मूल्य रु. 200) उपलब्ध आहेत. सर्वांनी आवर्जून पहावे, अनुभवावे अशी ही कलाकृती आहे.

प्रख्यात अभ्यासक डॉ. सुनील देवधर यांनी त्याचे लेखन, गीते लिहीली आहेत तर या नाटकाची संकल्पना, दिग्दर्शन कथ्थक नृत्यांगना मुग्धा पोतदार-पाठक यांनी तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार श्याम भुतकर यांनी या सेटची रचना केली आहे.

निखिल महामुनी आणि आमोद कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. कुणाल फडके, पूजा मेहता, ओंकार शिंदे आणि मुग्धा पोतदार-पाठक यांनी भूमिका साकारल्या आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *