अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं आवाहन

WhatsApp Logo हडपसर न्युज ब्युरो Hadapsar News

The appeal of the central system is not to accept WhatsApp calls or videos from unknown numbers

अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं केंद्रीय यंत्रणेचं आवाहन

नवी दिल्ली : अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं केंद्रीय यंत्रणेचं आवाहन आहे.WhatsApp Logo हडपसर न्युज ब्युरो Hadapsar News

व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल किंवा व्हिडीओ संदेश पाठवून व्हायरस हल्ला करण्याचे प्रकार नजिकच्या काळात उघड झाले आहेत.

या माध्यमातून समाज विघातक व्यक्ती किंवा संघटना कॉल केलेल्या व्यक्तीच्या मोबाइलमध्ये काही सॉफ्टवेअर टाकतात आणि त्याआधारे त्या व्यक्तीचा किंवा त्याच्या ओळखीतल्या लोकांची माहिती, बँक खात्याचं विवरणाची चोरी केली जाते.

त्यामुळं अनोळखी व्यक्तीने केलेला व्हीडीओ कॉल किंवा अनोळखी क्रमांकावर आलेला व्हिडीओ डाऊनलोड करू नये असं आवाहन केंद्र सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं केलं आहे.

तसंच हे प्रकार टाळण्यासाठी व्हॉट्सअपने वेळोवेळी दिलेले अपडेट इन्स्टॉल करावे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *