मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ३३५ अंकांनी वधारला

The BSE benchmark Sensex rose by 1,335 points today

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ३३५ अंकांनी वधारलाBombay Stock Exchange Hadapsar Latest News, Hadapsar News, हडपसर मराठी बातम्या

मुंबई : रशिया-युक्रेन दरम्यानचा तणाव निवळण्याचे संकेत, आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पुन्हा एकदा ६० हजार तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टिनं १८ हजाराची पातळी पार केली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ३३५ अंकांनी वधारला आणि ६० हजार ६१२ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ३८३ अंकांनी वधारला आणि १८ हजार ५३ अंकांवर बंद झाला.

रशिया-युक्रेन दरम्यान शांततेबाबतच्या चर्चेला यश मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या भावातही घट झाली. त्यामुळे तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय बाजारपेठेला दिलासा मिळाला. या सर्व घटनांचे सकारात्मक पडसाद आज बाजारातल्या तेजीमधून उमटल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगतलं.’

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *