Around fourteen lakh cash was seized in the Chinchwad constituency
चिंचवड मतदारसंघात सुमारे चौदा लाखाची रोकड घेतली ताब्यात
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकाने (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) आज दुपारी दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनात आढळून आलेली सुमारे १४ लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाने ही कामगिरी केली आहे.
या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तात्काळ याबाबत आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करुन आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
एसएसटी पथकाद्वारे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून २४ तास हे पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने बारकाईने नजर ठेवली जात आहे.
पथक नाका, चेकपोस्ट अशा ठिकाणी तपासणी करीत असून या मतदानापूर्वी शेवटच्या ४८ तासात अधिक बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.
आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरु असून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व सबंधित पथकांनी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com