गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८० अब्ज डॉलर्सवर

जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन Inauguration of Biotech Startup Expo - 2022 by the Prime Minister हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

The country’s bio-economy has grown eightfold in the last eight years, from  10 billion to  80 billion – Prime Minister

गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८० अब्ज डॉलर्सवर – प्रधानमंत्री

जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो – 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदान इथं आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो – 2022चे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या ई पोर्टलचे लोकार्पणही झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंग, बायोटेक क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक, लघू आणि मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते.जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन Inauguration of Biotech Startup Expo - 2022 by the Prime Minister हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८० अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जैव तंत्रज्ञानाच्या जागतिक परिसंस्थेमधल्या पहिल्या १० देशांच्या संघापासून भारत फार दूर नसून गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतीय डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी जगभरात महत्व संपादन केल्याचं ते म्हणाले.

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अमाप संधींची भूमी म्हणून संबोधण्यामागे पाच मुख्य कारणं आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पहिले – वैविध्यपूर्ण लोकसंख्या आणि वैविध्यपूर्ण हवामान क्षेत्र, दुसरे- भारताचे प्रतिभावंत मनुष्यबळ, तिसरे – भारतात व्यवसाय सुलभीकरणासाठी होत असलेले प्रयत्न, चौथे- भारतात जैव-उत्पादनांची सातत्याने वाढणारी मागणी आणि पाचवे- भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र आणि त्याच्या यशस्वितेचा उंचावणारा आलेख.

यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून पुढील २५ वर्षांच्या प्रगतीला गती देण्यात जैव-तंत्रज्ञान क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विविध क्षेत्रांच्या विकासाच्या केंद्रस्थानी असून भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात सरकारने केलेल्या गुंतवणुकीमुळे जैव-तंत्रज्ञान क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं ते म्हणाले. एक्स्पो हा उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातले नेते, वैज्ञानिक, संशोधक, उत्पादक, नियामक सरकारी अधिकारी आणि अन्य घटकांना एकत्र आणणारं व्यासपीठ ठरेल असं ते यावेळी म्हणाले.

“सर्वाधिक मागणी असलेल्या क्षेत्रांपैकी जैवतंत्रज्ञान क्षेत्र एक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात राहणीमान सुलभता (इज ऑफ लिव्हिंगच्या) मोहिमांनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी संधींची नवीन कवाडे खुली केली आहेत.” आरोग्य, कृषी, ऊर्जा, नैसर्गिक शेती, जैव पोषणयुक्त बियाणे हे या क्षेत्रासाठी नवीन मार्ग प्रशस्त करत आहेत, असे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

हडपसर न्युज ब्युरो

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *